ताज्याघडामोडी

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना अर्ज करण्यासाठी मोफत नोंदणी  सुविधा- तहसिलदार सुशिल बेल्हेकर

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना अर्ज करण्यासाठी मोफत नोंदणी  सुविधा- तहसिलदार सुशिल बेल्हेकर

 

             पंढरपूर दि. 08 :- कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या  कुटूंबातील वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अर्जासाठी शासनाने संकेतस्थळ विकसित केले असून, कुटूंबातील वारसांना अर्ज करताना कोणतेही अडचण येवू नये, यासाठी पंढरपूर तहसिल कार्यालय व तालुक्यातील सर्व महा-ई सेवा केंद्रावर दिनांक 11 व 12 डिसेंबर 2021 रोजी मोफत अर्जाची नोंदणी केली जाणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

            तालुक्यात कोरोना मुळे अनेक लोक बाधित झाले होते तर काही बाधितांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटूंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या निर्देशानुसार व प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदशानाखाली पंढरपूर तहसिल कार्यालय, पंढरपूर व तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्राचे सदस्य असलेल्या 56 केंद्रामध्ये अर्जदारांना अर्ज करण्यासाठी सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या  कुटूंबातील  नातवाईकांनी  दिनांक 11 व 12 डिसेंबर (शनिवार व रविवार)  2021 रोजी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.

            सदर मदत आधार क्रमांकाव्दारे ओळख पटवून वारसांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने. अर्जदाराने स्वत:तपशील, आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बॅक तपशील, बँकेचा रद्द चेक,कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा वैद्यकीय तपशील,आधार कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, तसेच निकटवर्तीय नातेवाईकांचे ना हरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे बंधनकारक आहे. तरी या सुविधेचा संबधितांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री.बेल्हेकर यांनी केले आहे. तसेच  http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावरुनही अर्ज करु शकता असे त्यांनी यावेळी  सांगितले.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago