माजी उपनगराध्यक्ष हमीदभाई बागवान यांचे दुःखद निधन

पंढरपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष,बागवान समाजाचे धाडसी आणि अभ्यासू नेते हमीदभाई लतीफ बागवान यांचे शनिवार दिनांक ४ रोजी पहाटे अल्पशा आजराने निधन झाले.सन २०११ ते २०१६ या कालावधीत त्यांनी पंढरपूर नगर पालिकेचे नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली तर याच काळात त्यांनी उपनगराध्यक्ष पदही भूषविले.सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी अतिशय आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाज बांधवांमध्ये त्यांनी मोठ्या जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते.त्यांचा दफनविधी आज दुपारी २ वाजता होणार आहे.

त्यांच्या निधनाने बागवान समाजातील एक धडाडीचे नेतृत्व हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago