फॅबटेक पब्लिक स्कूलच्या प्रांगणात चिमुकल्यांचा किलबिलाट

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रांगण  चिमुकल्यांच्या आवाजाने गजबजून गेले. शासनाच्या निर्णयानुसार १  डिसेंबर पासून शाळा सुरू झाली असून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर फॅबटेक पब्लिक स्कूलची शाळा  उत्साहात पुन्हा सुरू झालीआहे. विद्यार्थ्यांची काळजी व  नियमांचे पालन करून शाळेने पूर्ण तयारी केली होती.शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक होते तर विद्यार्थीही शाळेत येण्यासाठी इच्छुक  होते. शाळेच्या वर्गखोल्या सॅनिटाइज करून सुशोभित करण्यात आल्या होत्या.  विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यात आली होती. सर्व मैदान स्वच्छ करण्यात आले  होते.
नव्याने शाळेत आलेली मुले सजलेली शाळा पाहून खुश झाली व  कुतुहलाने पाहू लागली. पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजू लागली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे  औक्षण करून  व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.  प्रतेक विद्यार्थ्यांचे तापमानाची नोंद केली.प्रार्थनेचे स्वर प्रांगणात ऐकू येऊ लागले. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन शाळेत मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने हजेरी लावली. पालकांनीही शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत मुलांना शाळेत आणून सोडले. कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व शाळेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शाळा पुन्हा उत्साहात सुरू झाली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

1 day ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago