राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे.
त्यातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे.
30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावआणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने मच्छिमारांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी समुद्रात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटरवर पोहोचण्याची शक्यता असल्याने एक आणि दोन तारखेला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या तर दोन आणि तीन तारखेला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…