ताज्याघडामोडी

लॉजवर विवाहितेची हत्या तर तरुणाची साडीने गळफास घेत आत्महत्या

पुण्यात काही झालं तरीही गुन्ह्यांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आजही असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. दिघी येथे एका लॉजमध्ये महिलेचा गळा आवळून स्वतः आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता समोर आला असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दोघांत काहीतरी वाद झाले आणि प्रकाशने महिलेचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः साडीचा फास घेऊन आत्महत्त्या केली. गुरुवारी सकाळी १० वाजता लॉज सोडणार होते. पण त्यांनी ते बाहेर न आल्याने लॉजच्या व्यवस्थापकाने बाहेरून आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पोलिसांना माहिती देऊन दरवाजा उघडला असता दोघे मृतावस्थेत दिसले.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे दोघांचे मृतदेह नग्नवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तातडीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago