ताज्याघडामोडी

आझाद मैदानावरील एसटी कामगारांचे आंदोलन मागे; विलिनीकरणासाठी लढा सुरु ठेवणार

कामगारांच्या वेतनात ४१ टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता एस टी कामगारांनी एक पाऊल मागे घेत आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित केले आहे.आमदार गोपीनाथ पडळकर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली असून विलिनीकरण होईपर्यंत लढा सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

एस टी कर्मचार्‍याचे शासकीस कर्मचार्‍यांमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानावर गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील एस टी ची वाहतूक ठप्प झाली आहे. या आंदोलनात मुख्य तिढा हा विलिनीकरणाचा होता. त्यावर तात्पुरता तोडगा म्हणून राज्य सरकारने एस टी कर्मचार्‍यांच्या पगारात ४१ टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.

तसेच दर महिन्यांच्या १० तारखेपर्यंत कर्मचार्‍यांचे पगार होईल, याची हमी सरकारने घेतली आहे. तसेच समितीच्या अहवालानंतर विलिनीकरणावर निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानंतर आता कामगारांशी चर्चा करुन गोपीनाथ पडळकर यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.

जे पदरात पडतेय ते घेऊन पुढे जायचे आहे. लढाईतील पहिला टप्प्यात आम्ही जिंकलो आहेत. विलिनीकरणाचा निर्णय घेण्यास वेळ लागणार असल्याने आता तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे पडळकर यांनी सांगितले. आंदोलन मागे घेण्याची घोषणा झाली असली तरी राज्यभरातील कर्मचारी हे मान्य करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago