पंढरपुर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांकडून,छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत जोडणी तोडण्यात येत आहे. महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पिके पाण्या वाचून सुकत आहेत. आधीच कोरोना मुळे गेले दोन वर्षे सामान्य नागिरक,छोटे मोठे व्यवसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत.त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी केली आहे.
पंढरपूर तालुक्यात ऊस,द्राक्ष,केळी,डाळींब आदी पिकांना वेळेत पाणी देणे गरजेचे असते मात्र महावितरण कडून थेट कनेक्शन कट केले जात असल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे.गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा समाना करताना कसा बसा टिकून राहिलेला शेतकरी महावितरणच्या या मोहिमेमुळे उध्वस्त होणार आहे.त्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागणार आहे.जर तात्काळ हि मोहीम थांबविली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…