गुन्हे विश्व

बिरोबा मंदिरासमोरील मंडप का पाडला म्हणत तुंगत येथे एकास जबर मारहाण

पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एम.एस.सी.बी.च्या पाठीमागे असलेल्या बिरोबा देवस्थानची एक एकर पाच गुंठे जागा असून त्यामध्येच बिरोबाचे  देवस्थान आहे.महादेव सुखदेव देवकर हे सदर बिरोबा मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहतात.मंदिरासमोरील सभामंडपाच्या नूतुणीकरणीकरिता जि.परिषद सोलापूर फंडातून सभापंडपाकरिता 05 लाख रूपये मंजूर झाल्याने सदर मंडपाचे काम सुरु करण्यात आले आहे.

पूर्वीचा जुने व निर्जीव झालेला सभा मंडप पाडण्यात येत आहे.दिनांक 17/11/2021 रोजी दुपारी01/00 वा.चे सुमारास महादेव सुखदेव देवकर हे मंदिराच्या कामाची पाहणी करावी व बिरोबाचे दर्शन करण्याकरिता मंदिराजवळ आले असता तेथे आलेल्या गावातील अंकुश विठ्ठल काळे याने फिर्यादीस कोणाला विचारून सभामंडप पाडला असे म्हणून मला शिविगाळी करीत जवळच पडलेली लाकडी काठी हातात घेवून मारहाण केली अशा आशयाची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago