परत एसटीतुन प्रवासी घेऊन आला तर तुम्हाला बघुन घेतो !

राज्यात गेल्या ११ दिवसापासून एसटी कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर असून त्यामुळे राज्यातील बहुतांश एसटी आगारातील प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले.एकीकडे राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून संपात सहभागी झालेल्या शकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत आहे तर हजारो कामगारांना सेवा समाप्तीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत.
मात्र तरीही बहुतांश एसटी कमर्चारी संपावर ठाम असतानाच काही कर्मचारी कारवाईच्या धास्तीने कामावर परतू लागले आहेत.मात्र कामावर परत आलेल्या कर्मचाऱ्यांना रोषास सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असून मिरज एसटी आगारातून पंढरपूकरकडे आलेल्या एसटी चालकास कासेगाव हद्दीतील पंढरपुरकडे वळणारे बायपास जवळ एसटी थांबवून मारहाण करत परत एसटीतुन प्रवासी घेऊन आला तर तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी देण्यात आल्याची फिर्याद सोमनाथ रामचंद्र कोळी या चालकाने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ३ अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादी नुसार सदर घटना दिनांक 14/11/2021 रोजी सायंकाळी 06/30 वाचे सुमरास घडली असून शासकीय कामात अडथळा आणला आहे.म्हणुन माझी अज्ञात दोन अनोळखी इसमाविरुध्द भादंवि ३२३,३५३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago