भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पोलिसात दमदाटीची तक्रार

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी  गेल्या ६ दिवसापासून संपाचे हत्यार उपसले आहे.या संपास भाजपने पाठींबा व्यक्त केला असून राज्यातील भाजपचे विविध नेते,पक्ष पदाधिकारी हे या संपात सक्रिय सहभागी होत आहेत.मुंबईत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व आ.सदाभाऊ खोत हे कामगारांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.मात्र याच वेळी महाविकास आघाडीकडून भाजपने या संपाचे राजकारण सुरु केले आहे असा आरोपही केला जात आहे.अशातच आता सोलापूर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांनी सोलापूरचे एस.टी.विभाग नियंत्रक राठोड संपात सहभागी होत नाहीत म्हणून त्यांना दमदाटी केली . तर कर्मचाऱ्यांवरील निलंबन मागे घ्या, त्यांना कामावर जाण्याची सक्‍ती करू नका, असे म्हणून त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्यास अडथळा आणल्याप्रकरणी विभाग नियंत्रक विलास राठोड (यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या बाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याशी पंढरी वार्ताच्या वतीने संपर्क केला असता सोलापूर एसटी आगाराचे काही कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.यामुळे त्यांच्या प्रकृतीस धोका संभवतो अशातच एसटी कर्मचाऱ्यांवर संप मागे घेण्याबाबत दबाव आणला जात आहे याची माहिती मिळताच आम्ही सोलापूर विभाग प्रमुख राठोड याना भेटण्यासाठी गेलो.यावेळी पुढे गेलेल्या काही महिलांना विलास राठोड यांनी अपमानास्पद वागणूक दिली.त्या बाबत सदर महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता याची माहिती एसटी चे सोलापूर विभाग प्रमुख विलास राठोड यांना मिळाल्याने त्यांनी आमच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.         
तर एसटी कामगारांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्याससाठी आलेल्या भाजप भटक्या विमुक्त  महिला आघाडीच्या अध्यक्षा माया अर्जुन माने यांनीही एसटीचे सोलापूर विभाग नियंत्रक विलास राठोड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत तू इथे कशाला आली आहेस असे म्हणत विलास राठोड यानी केबिनच्या बाहेर हो असे सांगत धक्काबुकी केली असे या तक्रारीत नमूद केले आहे. 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago