ताज्याघडामोडी

युवासेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुख पदी चेतन नेहतराव यांची निवड

शिवसेना प्रणित युवासेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी चेतन मुकूंद नेहतराव यांची निवड करण्यात आली असून शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या हस्ते त्यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रवी मुळे,युवासेना शहर प्रमुख महावीर अभंगराव,एसटी कामगार सेना अध्यक्ष विनय वनारे,उपशहर प्रमुख पोपट सावंतराव,एसटी कामगार सेना अध्यक्ष नितीन कोडक(सांगोला),विभागीय सचिव संजय गंगणे,सचिव गणेश पवार,अक्षय नेहतराव,प्रवीण माने,अरिफ शेख,अक्षय माने आदी उपस्थित होते.
या निवडीनंतर बोलताना युवा सेनेचे नूतन शहर उपप्रमुख चेतन नेहतराव यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून युवा सेनेच्या माध्यमातून काम करीत असताना सर्वसामान्य जनता,असंघटीत खाजगी कामगार,अंध अपंग यांच्या प्रश्नासाठी आपण सदैव तत्परतेने कार्यरत राहून शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे प्रश्न सोडविण्यासाठी परिश्रम करू अशी ग्वाही दिली.या निवडीनंतर चेतन नेहतराव यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 
                   
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago