पंढपुरात कॉटन एक्स्पोच्या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

दिवाळीच्या सणानिमित्त सध्या पंढरपुरात खरेदीसाठी बाजार पेठांमध्ये ग्राहकाची मोठी वर्दळ दिसून येत आहे.मात्र याच संधीचा फायदा चोरटे उचलत असून सोमवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११चे सुमारास कोर्टी येथील एक कुटंब कपडे खरेदीसाठी स्टेशन रोड येथील कॉटन एक्स्पो च्या ठिकाणी आले असता गर्दीचा फायदा उचलत चोरट्याने महिलेच्या पिशवी मधील  06 ग्रँम वजनाची सोन्याची चैन (रिमझिम) व 1ग्रँम वजनाचे सोन्याचे बदाम असलेले पाकीट हातोहात लंपास केले आहे.या बाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या स्टेशन रोडवरील कॉटन एक्स्पो या तयार कपडे विक्रीच्या ठिकाणी ग्राहकांची मोठी वर्दळ असून या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना वाहने लावण्यासाठी पार्किंगची सोय नाही,त्यामुळे या ठिकाणी सतत ट्रॅफिक जाम होत असल्याने गोधळाची परिस्थिती निर्माण होत आहे.अशा वेळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे लक्ष विचलित करून चोरीच्या घटना घडू शकतात त्यामुळे या ठिकाणी शहर वाहतूक शाखेने कायम स्वरूपी वाहतूक कर्मचारी तैनात करणे गरजेचे झाले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago