माहिती अधिकार अर्ज दाखल करून खंडणी मागणाऱ्यास अटक

माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा (आरटीआय) राज्यात सुळसुळाट झाला असून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतच्या तक्ररीची दखल घेत संशयास्पद हेतूने वारंवार माहिती अधिकार अर्ज दाखल करणाऱ्या काही व्यक्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.मात्र पुढे सत्तांतर झाल्याने हा विषय मागे पडला.मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा माहिती अधिकाराच्या नावाखाली माहिती मागवून गैरहेतूने वापर केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असतानाच पुणे परिसरात बिल्डरांना या कायद्याचा दुरुपयोग करत खंडणी खोरी करणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
  पुणे शहरातील बांधकाम व्यवसायिकांना माहीती अधिकार कायद्याची भिती दाखवुन खंडणीची मागणी करणारा सराईत गुन्हेगार राजेश बजाज व त्याचे साथीदारास अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणी विरोधी पथक दोनने केली आहे.शहरातील बांधकाम व्यवसायिकांना माहीती अधिकार कायद्याची भिती दाखवुन तसेच सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची भिती घालुन आरोपी राजेश बजाज खंडणीची मागणी करत होता असा त्याच्यावर आरोप आहे.यापुर्वी त्याचेवर,डेक्कन ,कोरेगाव पार्क ,शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.     
शासनयंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी ‘माहितीचा अधिकारकायदा २००५’ या कायद्याची निर्मिती झाली.हा कायदा हा भारतीय नागिरकांना लोकशाहीचे खरे अधिकार प्रदान करणारा कायदा आहे. त्यामुळे केवळ माहिती अधिकार अर्ज दाखल करून माहिती मागवून मागितलेल्या माहितीनुसार आढळलेल्या,त्रुटी,गैरप्रकार याची वरिष्ठ पातळीवर तक्रार न करता केवळ शासकीय कर्मचाऱ्यावर दबाव टाकून गैरहेतू साध्य करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्दर्शनाखाली तक्रार दाखल करणे गरजेचे झाले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago