भीमा नदीतून गौण खनिजाची चोरी,पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करत टिपर घेतला ताब्यात

पंढरपूर शहर हद्दीतील भिमा नदी पात्रातुन मरळ मातीचा चोरुन उपसा करुन वाहतूक करणाऱ्या टिपरवर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या घटनेत पांढऱ्या रंगाचा टिपर रजि. क्र. डब्ल्यु. बी. 33 सी 8287 च्या सहाय्याने अवैद्यरित्या वाहतुक करत असल्याचे आढळून आल्याने मातीसह ताब्यात घेण्यात आला आहे.
सदर प्रकरणी इसम नामे 1) जयराम चिमाजी जाधव, वय 32 वर्षे, रा. पद्मावती गल्ली, पंढरपूर (टिपर चालक) 2) मदन बाबुराव गोंडफळे, वय 55 वर्षे, रा. अनिलनगर, पंढरपूर , पंढरपूर, जि. सोलापूर हे कुंभार नामे 3) सिद्धु कुभार, रा. कुंभार गल्ली, पंढरपूर यांचे सागंणेवरुन 4) सोमनाथ शिवाजी पाटील, रा. कवठळी, ता. पंढरपूर यांच्या विरोधात 379, 109, 34 भादवि सहकलम 21(4) गौण खनिज अधि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी समाधान केरु माने, वय 29 वर्षे, धंदा नोकरी (पोलीस शिपाई 2190) यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार स.पो.नि. मगदुम, पो.हवा. कदम,पो.ना.पठाण, बनसोडे व पो.शि. पाटील यांनी अर्बन बँक चौक, पंढरपूर येथे सापळा लावुन हि कारवाई केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago