Categories: Uncategorized

घरात घुसून तरुणीचा खून

नांदेड शहरातील शारदानगर येथील झेंडा चौक परिसरात प्रेमप्रकरणातून एका तरुणीचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणातील आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. ॲड. हरडफकर यांच्या घरात भाडेतत्वावर राहणारी वैष्णवी संजयसिंह गौर (२१) व आरोपी सुरेश देविदास शेंडगे (२६ रा. पांगरी) या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसले आणि दोघेही एकमेकांपासून दुरावले होते.

याच कारणावरून आरोपी सुरेशने वैष्णवी घरात एकटीच असल्याची संधी साधून रविवारी दुपारी १२.१५ ते १२.३० दरम्यान धारदार खंजीरने गळा चिरून तिची हत्या केली. घटनास्थळी तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडला होता. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी विमानतळ पोलिसांना दिली. पोलिस पोहोचले तेव्हा आरोपी सुरेश पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago