वारंवार होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. विष प्राशन करत या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत शिक्षण घेणारा एक मुलगा वारंवार तिची छेड काढत असे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीने यासंदर्भात आपल्या कुटुंबाला सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाला जाब विचारुन समजही दिली होता.
या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणात तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…