भटुंबरे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

वारंवार पोलीस कारवाया आणि तरीही सातत्याने होत असलेला अवैध वाळू उपसा हा शहर तालुक्यात चर्चेचा विषय झाला असून या साऱ्या घडामोडीत ज्यांच्याकडे या गौण खनिजाची मालकी आहे त्या महसूल प्रशासनाचे कर्मचारी मात्र सहसा कुठे कारवाई करताना दिसून येत नाहीत.गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर झालेल्या कारवायांचा आढावा घेतला तर बहुतांश कारवाया या पोलीस कर्मचार्यांनी केलेल्या असल्याचेच दिसून येईल.महसूल प्रशासनाच्या अधिनस्त असलेले तलाठी,मंडल अधिकारी,पोलीस पाटील यांनी स्वतःहून केलेल्या कारवायांचे प्रमाण अतिशय नगण्य असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दंडात्मक कारवाया करण्यातही महसूल प्रशासनातील काही कर्मचारी टाळाटाळ करतात कि काय अशी शंका व्यक्त होते.
   दिनांक २१ ऑक्टोबर रोजी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भटूबरे तालुका पंढरपूर येथे कारवाई करत  4,04,000/- रू किंमतीचे एक राखाडी रंगाचा अशोक लेलंड कंपणीचे पिकअप वाहन ( आर.टी ओ.MH-09 FL 2730 ) हौदातील अर्धा ब्रास वाळुसह ताब्यात घेतले असून पिकअपचे अज्ञात चालक व मालक यांचेविरूद्ध भादवि 379,34 सह गौण खनिज कायदा कलम 4(1)4(क)(1) व 21, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago