ICC T20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी ‘हाय व्होल्टेज’ सामना म्हणजे हिंदुस्थान-पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.
खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हा सामना खेळण्यावर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवणं चुकीचं आहे. हा सामना थांबवला पाहिजे. खेळाडूंनाही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखलं पाहिजे. यासंदर्भात मी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिणार आहे.
रामदास आठवले यांच्या आधी एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी देखील हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असताना, हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले करत असताना त्यांच्याशी सामना खेळणं चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…