ताज्याघडामोडी

परतीचा पाऊस झोडपणार! येत्या 24 तासात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे.

अशातच आता कोकण, मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत भागात 24 तासात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे.

येत्या 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पडणार आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा आणि वाशीममध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी 16 ऑक्टोंबरला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

16 ते 17 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील परिसरासह वादळी वाऱ्याच्या वेगाने पाऊस पडणार आहे. विदर्भतील काही भागातही अशातच स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. गेल्या 24 तासात पुण्यासह, मुंबई परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. आजही नवी मुंबईसह इतर परिसरात पाऊस झाला. राज्यातील इतर भागात 24 तासात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होणार असल्यामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago