पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार दिपक नागनाथ घोडके हे रात्री ९ वाजता आपले दुकान बंद करून भुवनेश्वरी मंदिराजवळ कासेगाव रोड येथील आपल्या घरी मोटारसायकल वरून परतत असताना अशोक लेलॅंड कंपनीचा बिगर नंबरचा मिनी ट्रक चालक दुकानदार दिपक नागनाथ घोडके यांना ओव्हरटेक करून पुढे आला.त्यावेळी किन्नर साईडला बसलेल्या इसमाने आमच्या ट्रकला कट का मारला असे म्हणत गाडी उभा केली.
गाडीतून खाली उतरत पाठीत व उजव्या बरगडीवर विटेने जोराने मारहाण केली.तर यावेळी सोबत असेल्या दुसऱ्या गाडीतून आलेल्या इसमानीही विटेने व कड्याने मारहाण केली अशा आशयाची फिर्याद दिपक नागनाथ घोडके यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ४ व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून मारहाण करणा-या अशोक लेलंड मिनी ट्रक मधील इसम हे 20 ते 25 वयोगटातील सावळे रंगाचे त्यांची उंची साधारण साडेपाच फुट असावी त्याना दाखवल्यास मी ओळखू शकतो अशी माहिती फिर्यादीने फिर्यादीत दिली आहे.फिर्यादीने कट मारलेला नसताना बिगर नंबरच्या वाहनातून आलेल्या व्यक्तीकडून मारहाण केली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…