भीमा नदीकाठच्या लोकांना पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयाकडून सतर्कतेचा इशारा

पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे उजनी धरणात दौण्डहून येणाऱ्या निसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज वर्तविला असून त्यामुळे उजनी धरण व्यस्थापन सतर्क झाले आहे.आज रात्री ९ वाजता उजनी धरणातून ५ हजार क्युसेक्स वेगाने भीमा नदीत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पंढपुरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या बाबत प्रांताधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार आज रात्री ८ वाजता उजनी धरणाचा उपयुक्त साठा १०८% इतका झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे.यामुळे दौण्डहून निसर्गात वाढ होण्याची शक्यता असून पुरनियंत्रणाच्या दृष्टीने धरण व्यवस्थपणाने आज रात्री ९ वाजले पासून ५ हजार क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडण्याचे निश्चित केले.या विसर्गात परिस्थिती पाहून कमी जास्त करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

16 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago