मोटारीला गाडी घासल्याचा जाब विचारल्याचा राग आला म्हणून वकील महिलेसह पतीवर त्रिकुटाने कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील जय शिवाजी मंडळ येथे घडली.
याप्रकरणी रितेश कोंढरे (रा.बिबवेवाडी) आणी त्याच्या दोन साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 28 वर्षीय महिला वकील असून त्या पतीसह मोटारीने चालल्या होत्या. त्यांच्या गाडीला रितेश कोंढरे व त्यांच्या साथीदारांची गाडी घासून गेली. त्यामुळे फिर्यादी महिलेनेने त्यांना जाब विचारला असता, आरोपी रितेश कोंढरे साथीदारांच्या मदतीने वकील महिला आणि पतीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने वार हाताने अडविल्यामुळे त्या जखमी झाल्या. यानंतर आरोपींनी महिलेच्या पतीला बॅटने मारहाण केली. त्यांच्या गाडीची काच फोडून नूकसान केले. तुमची विकेट घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…