सोलापूर जिल्ह्यात उचचांकी गाळपाचे अनेक पुरस्कार प्राप्त केलेला व सर्वाधिक दर देणारा व ऊस गाळपास पाठविलेल्या शेतकऱ्यांना वेळेत उसाची बिले अदा करणारा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विट्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याकडून चेअरमन आ.बबनदादा शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दीपावली सणानिमित्त आज पटवर्धन कुरोली ता.पंढरपूर येथे सभासदांना साखर वाटप करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना नागेश उपासे म्हणाले कि, सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी पूर्णपणे देऊ शकले नसताना व अनेक साखर कारखान्यांचा रेड झोनमध्ये समावेश साखर आयुक्तांनी केलेला असताना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाईनगर ता.माढा व युनिट क्रमांक २ करकंब या दोन्ही कारखान्याने आगामी गळीत हंगामाची जोरदार तयारी केली असून दीपावली दसऱ्यासाठी 176 रु चे बिल जमा केले,तर आता सभासदांना साखर घरपोहोच केली जात आहे.कारखान्याच्या या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. यावेळी नागेश उपासे, शिवाजीदादा नाईकनवरे, काका उपासे,संपत्ति जवलेकर, औदुबर उपासे, विष्णु नाईक अण्णा नाईकनवरे, आप्पा नाईकनवरे, सोमनाथ देशमूख, कारखाना चिटबॉय माली साहेब, तसेच सर्वशेतकरी सभासद उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…