आझादी का अमृतमहोत्सव निमित्त कायदेविषयक जागृती
पंढरपूर दि. (01):- आझादी का अमृतमहोत्सव या निमित्त दिनांक 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कायदेविषयक जागृती करण्यासाठी तालुका वकील बार असोसिएशन व पंचायत समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश एम.बी. लंबे यांनी सांगितले.
आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातंर्गत कायद्याविषयक जागृती करण्याबरोबरच शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून, पॅन इंडीया जनजागृती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी विठ्ठल मंदीर परिसर ते शिवाजी चौक येथे सकाळी 8.30 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 03 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत, शेगांव दुमाला येथे सकाळी 10.00 वाजता , दि. 04 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे दुपारी 2.00 वाजता, दि. 05ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत, वाखरी दुपारी 2.00 वाजता , दि. 06ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत, चिचुंबे येथे दुपारी 2.00 वाजता, दि. 07 ऑक्टोबर रोजी तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे दुपारी 2.00 वाजता तर दि. 08 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालय, पंढरपूर येथे दुपारी 2.00 वाजता कायर्क्रमाचे आयोजन केले असल्याचे जिल्हा न्यायाधिश एम.बी. लंबे यांनी सांगितले.
या कार्यक्रमातंर्गत कायद्यासंबधी जागृती करण्याबरोबरच विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात येणार असल्याने जास्ती-जास्त नागरिकांना या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा न्यायाधिश एम.बी.लंबे यांनी केले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…