एका व्यक्तीने ऍमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन माध्यमातून मोबाइल खरेदी केला. मात्र पार्सलमध्ये केवळ चार्जर आणि केबलच ग्राहकाला मिळाली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.
विपुल विनोद पाटणी (वय 33, रा. फेज 1, हिंजवडी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऍमेझॉन कंपनी, डिलिव्हरी देणारे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी 14 सप्टेंबर रोजी 14 हजार 499 रुपयांचा मोबाइल ऑर्डर केला. मोबाइलची डिलिव्हरी पाटणी यांना 10 सप्टेंबर रोजी मिळाली. डिलिव्हरी मिळाल्यानंतर पाटणी यांनी मोबाइलचा बॉक्स न उघडता तसाच ठेवला.
काही वेळानंतर पाटणी यांच्या पत्नीने बॉक्स उघडला असता त्यामध्ये केवळ मोबाइल चार्जर व केबल तसेच इतर डॉक्युमेंट असल्याचे दिसले. फिर्यादी यांनी मोबाइल मिळाला नसल्याबाबत ऍमेझॉन कंपनीला संपर्क केला. कंपनीने या प्रकरणाचा तपास करून कळवतो, असे सांगितले. प्रकरणी पाटणी यांनी थेट ऍमेझॉन कंपनी आणि डिलिव्हरी देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात फिर्याद दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…