शासनाच्या विविध डीबीटी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळण्यासाठी,पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लायसेन्स,पासपोर्ट इ. काढण्यासाठी, वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेसाठी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज करण्यासाठी, स्वतःच्या स्वतः आधार मध्ये किरकोळ बदल करण्यासाठी तसेच आपल्या आधार कार्ड चा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी आधार अद्ययावतीकरण आधार सोबत मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे .यासाठी पंढरपूर डाक विभाग आणि तहसील कार्यालय , पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज तहसील कार्यालय पंढरपूर येथे मा. श्री. मनोज शोत्री , नायब तहसीलदार पंढरपूर यांचे प्रथम आधार मोबाईल लिंक करून आज पासून सुरू झालेल्या चार दिवसीय विशेष शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.सदर प्रसंगी पंढरपूर डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक श्री.आर.बी. घायाळ , बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, तक्रार निवारण अधिकारी श्री .सचिन इमडे, शाखा डाकघर रांजणी व चळेचे शाखा डाकपाल श्री. सुधीर इंगळे व आदिनाथ कुंभार, शेतकरी श्री.गणेश देशमुख सह कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित केलेल्या विशेष शिबिराचा सर्व लाभार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षक डाकघर पंढरपूर विभाग,पंढरपूर आणि तहसील कार्यालय ,पंढरपूर यांचे मार्फत करण्यात येत आहे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…