मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घातल्याने पोलीस शिपाई गणेश सोनलकर यांचा दोनच दिवसापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्यानंतर आता जिल्ह्यात वाळू चोरी करणारे महाभाग काही काळ तरी शांतता बाळगतील अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच कितीही गंभीर घटना घडल्यातरी वाळू चोरी करणारे मात्र मागे हटत नसल्याचेच चित्र पुन्हा दिसू लागले आहे.पंढरपूर तालुक्यातील व्होळे परिसरातील भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करून जाधववाडी रस्त्यावरून मोडनिंबकडे निघालेल्या टिपरला करकंब पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी कौठाळी येथील अरविंद भिमराव अटकळे व सोमनाथ अरूण लोंढे यांच्या विरोधात भोसे बिट अंमलदार म्हणून कार्यरत असलेले पो.ना. अरूण उत्तम कोळवले यांनी भादवि कलम 379,34व गौण खनिज कायदा 1978 सुधारीत कायदा 2015 चे कलम 4(1),4(क)(1)21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत करकंब पोलीस ठाण्याचे पो.स.ई मोरे,पो.हे.काँ. रानगट,पो.हे.काँ.घोळवे पो.ना. मोरे हे सहभागी झाले होते.या कारवाईत पांढ-या रंगाचा टाटा कंपनीचा 1618 माँडेल असलेला टिपर त्याचा आरटीओ क्रमांक MH 42 AF 5103 हा अंदाजे २ ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…