खरेदी खताची प्रत देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच घेताना अमरावती पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर यास मध्यस्थामार्फत लाच घेताना रंगेहाथ पकडले.
अमरावती पोलीस दलातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत राजू लेवटकर यांनी तक्रारदारांना खरेदी खताची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून यापूर्वी तीस हजार रुपये लाच घेतली होती. त्यानंतर लेवटकर याने रोहन भोपळे याच्या मध्यस्तिने 20 हजार रुपयाची मागणी केली होती. राजू लेवटकर व रोहन भोपळे यांनी तक्रारदारांकडून 20 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड ,अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत ,संजय महाजन ,एस.एस. भगत मार्गदर्शनाखाली अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…