ताज्याघडामोडी

पंढरपुरातील स्वबळावर नगरसेवक होण्याचे स्वप्ने पाहणाऱ्या समाजसेवकांच्या अडचणी वाढल्या

स्वबळावर नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व कुठलीही राजकीय बांधिलकी न मानता केवळ आपण आपल्या भागात केलेल्या जनसेवेचे बळावर नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक भावी नगरसेवकांना पंढरपुर सह राज्यातील सर्वच नगर पालिका निवडणुका एक सदस्यीय वार्ड रचनेनुसार होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला होता.दोन ते अडीच हजार मतदार संख्येचे वार्ड तयार केले जातील अशी अपेक्षाही होती.बहुसदस्यीय प्रभाग रचनेत बड्या नेत्याच्या आशिर्वादा शिवाय कार्यक्षेत्राबाहेरील मतदारांना सामोरे जावे लागत होते.तर आर्थिक तरतूदही मोठी करावी लागत होती.त्यामुळे फेब्रुवारी २०२० रोजी एक सदस्यीय वार्ड रचनेचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर अनेकांनी पालिका निवडणूक लढविण्याची आत्मविश्वासाने तयारी केली होती.मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नगर पालिकांच्या आगामी निवडणूका या व्दि सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेत महाविकास आघाडी सरकारने पक्ष विरहित व स्वबळावर राजकीय वाटचाल करू पाहणाऱ्या समाजसेवकांचा भ्रमनिरास केला आहे.

 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल, तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. पण 2 सदस्यीय प्रभाग पद्धत नगरपालिका आणि नगरपरिषदेत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठे राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान काही नेत्यांची पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महानगरपालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी, अशी काही नेत्यांची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. याबाबत सरकार ऐन वेळेवर निर्णय घेऊ शकते, असे राजकीय पक्षांचे मत होते. दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यामुळे सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असे झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभाग रचना केली जाण्याची शक्यता असते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 week ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

1 month ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

1 month ago