अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यांत तपासात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षकाने आरोपीकडे दहा हजार रूपयांची मागणी केली. तसेच ती लाच पोलीस नाईक कर्मचार्याच्या हस्ते घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले.अभिरूची पोलीस चौकीसमोर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
श्रीपती माणिक कोलते (वय 55, सहायक पोलीस उपनिरीक्षक) आणि शिवाजी बाळासाहेब जगताप (वय 34, पोलीस नाईक ) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे हवेली पोलीस ठाणे येथे नेमणुकीस आहेत. त्यांच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.अपघात प्रकरणात 33 वर्षिय तक्रारदारावर हवेली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात त्यास आवश्यक ती मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक श्रीपती कोलते यानी त्याच्याकडे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणार्या पोलिसांविरोधात तक्रार अर्ज दिला होता. लाचलुचपतच्या पथकाने मागील महिन्यात 26 ऑगस्ट रोजी तक्रारीची पडताळणी केली.
त्यानंतर मंगळवारी दि. 21 सप्टेंबर रोजी सापळा लावला. कोलते यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम पोलीस नाईक शिवाजी जगताप यांच्याकरवी स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यत घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर हे करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…