Categories: Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये आरोग्याचे महत्व आणि संतुलित आहार मार्गदर्शन संपन्न

सांगोला: फॅबटेक  एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि संतुलित  आहार या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केले होते. अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जा निर्मिती,कार्यशक्ती हे अन्नामुळे घडून येते. त्यामुळे आहारामध्ये संतुलित आहार व पोषण दृष्ट्या समतोल हवा. या कार्यक्रमासाठी पहिली ते चौथी या गटासाठी डॉक्टर अस्मा तांबोळी व चौथी ते नववी गटासाठी डॉक्टर  झीनत तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व सांगून संतुलित आहार कसा घ्यावा व  बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड हे कसे टाळावे याबद्दल  सांगितले. हा कार्यक्रम संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदरहनाखाली व  प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल लिगाडे   व सतीश देवमारे यांनी केले.  कार्यक्रमाचा समारोप  समाधान खांडेकर  व निसार इनामदार यांनी केला.  या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व  पालक वृंद ऑनलाइन  उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago