मुंढेवाडी येथे तलाठ्याच्या अंगावर पिकअप घालण्याचा प्रयत्न तर कोतवालास धक्काबुक्की

पोलीस आणि महसूल प्रशासन कारवाई करण्यात दमेना पण अवैध वाळू उपसा काही थांबेना अशी परिस्थिती पंढरपुर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांची झाली असल्याचे दिसून येत आहे.कधी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाकडून,कधी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलयातील विशेष पथकाकडून तर कधी विविध पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून अवैध वाळू उपशावर कारवाई केल्याच्या घटना वारंवार घडत असतात.तर अधून मधून महसूल विभागाचे कर्मचारीही कारवाई करताना दिसून येतात.
       आज दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता मुंडेवाढी तालुका पंढरपूर येथे घडलेल्या घटनेत अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार तलाठी मुसाक खमरुद्दिन काझी यांच्या निदर्शनास आला असता कोतवाल महादेव खिलारे यांना सोबत घेत गावातील मुख्य कमानीजवळ अजनसोंड रोडने मुंढेवाडीकडे एक पांढरे रंगाचे पिकअप येत असताना दिसले.सदरचे पिकअपला हात दाखवून थांबवण्याचा ईशारा केला, परंतू सदरचे पिकअप चालकाने आपले ताब्यातील पिकअप तलाठी मुसाक शेख यांच्या ऑक्टिवा गाडी नं. एम.एच. 13 डी.एल. 4053 गाडीवर घालण्याचा प्रयत्न करुन तसेच पुढे कोंढारकी रोडने निघून जाऊ लागले.यावेळी तलाठी काझी आणि कोतवाल खिलारे यांनी ऍक्टिव्हा गाडीवरुन पिकअपचा पाठलाग केला.त्यावेळी गावातील अभय मोरे, अनिल मोरे, अक्षय दांडगे, षरद मोरे हे देखील गावात कमानीजवळ होते.  थांबून परत हात दाखवून  थांबविण्याचा ईशारा केला असता सदरचे पिकअपमध्ये महेश गडदे रा.गोपाळपूर हा चालक व त्याचे बाजूला राहुल सावंत रा.गोपाळपूर हा बसला असल्याचे  दिसले. त्यानंतर पिकअप चालक महेश गडदे याने तलाठी काजी यांच्या दुचाकी गाडीवर पिकअप घालून परत अंगावर पिकअप घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते बाजूला झाल्याने वाचले. त्यावेळी पिकअप मधील महेश गडदे व राहुल सावंत यांना गाडी थांबवा गाडी थांबवा असे सांगत असतानाच कोतवाल महादेव खिलारेहे पिकअपचा वेग कमी झाल्याने जवळ गेले असता पिकअप चालक महेश गडदे याने गाडीमध्ये बसूनच कोतवाल खिलारे यांना धक्काबुक्की करुन ढकलून देवून चालक महेश गडदे व गाडीमधील राहुल सावंत दोघेही वाळुचे पिकअप तसेच पुढे कोंढारकी रोडने वेगाने घेवून पळुन निघून गेले अशा आशयाची फिर्याद तलाठी मुसाक काझी यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
     
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

7 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago