डिजिटल व्यवहार वाढण्यासोबतच सायबर चोऱ्या देखील वाढल्या आहेत. अशातच एक चूक देखील आयुष्याची कमाई वाया घालवू शकते. दरम्यान देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर भामट्यांपासून सतर्क केले आहे.
नुकतेच एसबीआयने आपल्या ग्राहबकांना एक फ्रॉड नंबर बाबतही अलर्ट दिला आहे.
एसबीआयच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये लिहले आहे की, खोट्या कस्टमर केअर नंबरपासून सावध रहा. एसबीआयच्या अडचणी किंवा सेवांच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरील क्रमांकावरच संपर्क करा. या शिवाय बँकेच्या खात्याची माहिती कोणासोबतही शेअर करू नका.
एसबीआयने म्हटले की, जर खोट्या कस्टमर केअर क्रमांकामुळे तुमच्याबाबत चुकीचे घडले असेल तर, report.phising@sbi.co.in वर तुमची तक्रार नोंदवा. किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 155260 या क्रमांकावर कॉल करा.
तुम्ही बनावट किंवा खोट्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केल्यास, सायबर भामटे तुमच्या बँक खात्याची आणि ओटीपीची माहिती घेऊन ऑनलाईन पैसे चोरू शकतात. त्यामुळे कोणालाही फोनवर तुमच्या खात्याचे तसेच डेबिट क्रेडिट कार्डचे डिटेल शेअर करू नका.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…