पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असली तरी येथून होणारी अवैध वाळू चोरी हा पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरला आहे असेच म्हणावे लागेल.काल शनिवार दिनांक 18/09/2021 रोजी रात्री ९ चे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना भटुंबरे येथून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पो.ना. तडवी,पो.कॉ.सुर्वे,पो.कॉ. हुलजंती हे सदर ठिकाणी दाखल झाले असता भटुंबरे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोरील रोडवर एक पांढ-या रंगाची पिकअप वाळू वाहतूक करताना आढळून आला.यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी अशोक लेलंड कंपनीचा पिकअप वाळूसह ताब्यात घेत चालक समाधान भिमा गायकवाड वय 25 वर्ष रा भटुंबरे ता पंढरपुर विरूद्ध भा.दं.वि. कलम 379,सह गौण खनिज कायदा1978चे कलम4(1),4(क)(1)व21 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…