लग्नास नकार देत असल्याच्या कारणाने खेडभोसे येथील एका तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा असल्याच्या प्रकरणातील ९ आरोपींचा अटकपूर्व जामीन येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी मंजूर केला आहे.
११ जून २०२१ रोजी रात्री १० वाजता खेडभोसे येथील सोमनाथ रामचंद्र पवार या तरुणास जीवे मारण्याच्या उद्देशाने या प्रकरणातील आरोपी कालिदास साळूंखे,कांतीलाल साळूंखे,मधुकर चव्हाण,अंकुश पाटील,शिवाजी पवार,सिद्धेश्वर पवार यांच्यासह ९ इसमांनी मयत सोमनाथ यास जीवे मारण्याच्या उद्देशाने ५ जणांनी हातपाय दाबून धरले व इतर चौघांनी मयतास विषारी औषध पाजले.या प्रकरणी करकंब पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली होती.त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.दरम्यान या प्रकरणातील आरोपींनी ऍड.पांडुरंग चवरे व ऍड.कुमार बाबर यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता.समोर आलेल्या सर्व बाबींचे अवलोकन करून व वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व ९ आरोपीना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…