ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातून पुन्हा दोन मोटारसायलची चोरी

पंढरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोटारसायकली चोरटे हातोहात लंपास करत असल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वारंवार घडत असून आता पुन्हा ७ व ८ सप्टेंबर रोजी शहरातून दोन मोटर सायकली चोरटयांनी लंपास केल्या आहेत.या प्रकरणी दोन्ही मोटार सायकलच्या मालकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या बाबत दाखल फिर्यादीनुसार मकरंद पुरुषोत्तम कुलकर्णी रा.गोविन्दपुरा पंढरपुर यांचे पंढरपुर नगरपरिषद येथील कर्मवीर औदुंबरराव पाटील व्यापारी संकुल येथे प्रथमेश इलेक्ट्रीक नावाचे दुकान आहे. 07/09/2021 रोजी सकाळी 10/00वा नेहमी प्रमाणे त्यांची हिरो होंडा फँशन काऴ्या रंगाची त्यावर निऴा पट्टा असलेली मोटर सायकल नं.MH13-AA1684 व्यापारी संकुल येथील पार्किंगमध्ये हँण्डल लाँक करुन पार्क केली होती. त्यानंतर दुपारी 02/00वा चे सुमारास जेवण करण्याकरिता घरी जाणेसाठी गाडी पार्क केलेल्या ठिकाणी गेलो असता मोटार सायकल पार्क केले ठिकाणी दिसून आली नाही.

तर दुसऱ्या घटनेत अशोक बंडु पवार वय 23वर्षे,जात-मराठा,धंदा-शेती,रा- खेड भाळवणी,ता.पंढरपूर हे पत्नी भाग्यश्री ही आजारी असल्याने उपचाराकामी दि.08/09/2021रोजी मावस भाऊ अजय सिद्धेश्वर शिंदे रा.मोडनिंब याची एच.एफ.डिलक्स मोटारसायकल नं. एम. एच. 45 ए .एच.9922 हिचेवरती,पंढरपुर येथे घेऊन आलो होतो.सिद्धु डायग्नोस्टिक सेंटर दगडुशेठ काँम्पलेक्स,सावरकर चौक या ठिकाणी त्यांनी आपली मोटारसायकल लावून ते आत गेले.परत आले असता त्यांना आपली मोटार सायकल चोरीस गेल्याचे दिसून आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago