ताज्याघडामोडी

५ होड्यातून होत होता अवैध वाळू उपसा १ सापडली ४ होड्या पळून गेल्या

 

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या हद्दीतून भिमानदीच्या पात्रातून करण्यात येणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक हा पंढरपूर तालुक्यात कायम चर्चेचा विषय ठरला आहे.या ठिकाणाहून करण्यात येणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपुर तालुका पोलिसांकडून वारंवार कारवाई केली तरी पुन्हा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे उधोग काही थांबत नसल्याचेच वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे दिसून येते.जिल्ह्यात वाळूचे लिलाव रखडल्यामुळे अवैध वाळू उपसा हे महिन्याकाठी लाखो रुपये मिळवून देणारे साधन झाल्याचे दिसून येते.वास्तविक पाहता या गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी हि संबंधित नदीकाठच्या गावातील तलाठी,मंडल अधिकारीयांची आहे.तलाठी,कोतवाल हे पद निवासी असल्याने डोळ्यात तेल घालून सरकारी मालमत्तेचे अर्थात वाळूसह गौण खनिजाचे रक्षण करणे,वेळप्रसंगी कारवाई करणे,कारवाई करत असताना आवश्यकता वाटल्यास पोलीस ठाण्यास वर्दी देऊन त्यांची मदत घेणे हा यांच्या कर्तव्याचा भाग समजला जातो.गावच्या नदीकाठच्या विविध गटाच्या हद्दीत नदीमध्ये व परिसरात किती वाळू साठा आहे याचे मोजमाप ठेवणे, त्याची माहिती जिल्हा महसूल अधिकारयांना कळविणे अपेक्षित असते.वाळू साठ्याची चोरी होऊ नये यासाठी शासनाने टोटल स्टेशन सिस्टीम प्रणालीद्वारे वाळू साठ्यांचे मोजमाप केले जावे आणि या वाळूसाठ्यांचे रक्षण केले जावे असे आदेश वेळावेळी काढले आहेत.मात्र गेल्या दीड वर्षाच्या कालावधीचा विचार करता तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर बहुतांश कारवाया या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः माहिती प्राप्त करूनच केल्याचे आढळून येते.

     गेल्या आठवड्यात आंबे येथीलच एका नदीकाठच्या शेतकरी पितापुत्रास अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाट देत नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.या नंतर बहुतेक महसूल प्रशासन आंबे परिसरातून होणार अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सक्रिय झालेले असतानाच  दिनांक 08/09/2021 रोजी आंबे परिसरातील भीमा नदीच्या पात्रातून भरदिवसा पुन्हा अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे समजताच आंबे येथील तलाठी प्रकाश तानाजी गुजले व कोतवाल महादेव खिलारे हे नदीपात्राकडे गेले असता त्या ठिकाणी 5 होड्याच्या माध्यमातून नदीपात्रातून वाळू काढली जात असल्याचे दिसून आले.यावेळी तलाठी आणि कोतवाल यांनी ठोस कारवाई करण्याचा प्रयत्न केला खरा पण केवळ एकच होडी ताब्यात घेण्यास त्यांना यश आले.बाकीच्या ४ होड्या पोहोरगावचा बाजूने पळून गेल्या.
या प्रकरणी तलाठी प्रकाश तानाजी गुजले यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात 1)सागर प्रकाश साळुंखे वय 23 वर्ष 2)नाना भगवान खिलारे वय 28वर्ष 3)दत्ता लक्ष्मण निळे वय27 वर्ष 4) सचिन भगवान खिलारे वय 25 वर्ष 5) राहुल राजाराम पुजारी वय 25 वर्ष सर्व रा आंबे ता पंढरपूर यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम379,34सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 सार्वजनिक संपत्ती नुकसान कायदा कलम 3,4 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.  
         
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

9 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

9 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago