गेली दोन वर्ष जगावरील कोरोनाचे संकट याही वर्षी कायम असल्याने शासनाच्या वतीने गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शासनाच्या या नियमांचे पालन करून पंढरपुर येथील युवक नेते मा निलेश जाधव मित्र परिवार डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर पंढरपुर यांच्यावतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवनिमित्त निलेश जाधव मित्र परिवाराच्या वतीने संतपेठ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर सभोवताली परिसरातील गणेश भक्तांना 101 गणेश मुर्तींचे मोफत वाटप घरोघरी करण्यात आले. यावेळी निलेश जाधव मित्र परिवारचे नागरिकांनी आभार व्यक्त केले.
राज्यासह पंढपुरात अनेक ठिकाणी सध्या गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरु आहे मात्र कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने सर्वसामान्य कष्टकरी कुटंबाचे अर्थकारण पूर्णतः संकटात सापडले आहे.रोजंदारीवर काम करणारे,छोटा मोठा व्यवसाय रोजगार करून उदर निर्वाह करणारे बहुतांश कुटंब सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे विविध सण साजरे करणे हे अनेक गरीब कुटूंबाना परवडणारे राहिले नाही.त्यामुळे गेल्या दीड वर्षाच्या काळात अनेक सण साजरे न करताच दिवस आलेले दिवस पुढे ढकलण्याचे काम अनेक गरीब कुटूंबाना करावे लागले आहे.पण गणेशोत्सव हा अबाल वृद्धांसह कुटूंबातील प्रत्येकाच्या दृष्टीने श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे.अशावेळी अनेक गरीब कष्टकरी कुटूंबाना श्री गणेशाची मूर्ती घरी आणणे हे देखील आर्थिक दृष्टया कठीण होऊन बसले आहे हे ओळखूनच आपण हा उपक्रम राबिवला असल्याची माहिती यावेळी निलेश जाधव यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…