ताज्याघडामोडी

धक्कादायक ! दोन वर्षांपूर्वी थाटामाटात केलेल्या प्रेमविवाहाचा तलाठ्याने असा केला दुर्दैवी अंत.

जुन्नर येथे तलाठी असणाऱ्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तसेच चाकूने वार करून निर्घृण खून केला. मोशीतील बोऱ्हाडेवस्ती परिसरात सोमवारी (दि.6) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.खून केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. सरला विजयकुमार साळवे (वय (32, रा.मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. विजयकुमार साळवे (वय 34, रा.मोशी) असे आरोपी पतीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजयकुमार साळवे हा जुन्नर येथे तलाठी आहे. मागील दोन वर्षांपूर्वी सरला आणि विजयकुमार यांचा प्रेमविवाह झाला आहे. ते दोघेही विदर्भातील असून मोशी येथे भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून विजयकुमार आणि सरला यांच्यात वाद नेहमी होत असे.

दरम्यान रविवारी रात्री सरला झोपल्या असताना विजयकुमार याने त्यांच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला. त्यानंतर चाकूने भोकसून निर्घृण खून केला. घटनेनंतर विजयकुमार फरार झाला. दरम्यान विजयकुमार आणि सरला दोघांच्याही ओळखीचा असणाऱ्या मित्राने त्यांना फोन केला. दोघेही फोनला उत्तर देत नसल्याने त्यांच्या घरी आला. घर बंद असल्याने मित्राला संशय आला.

त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता आतमध्ये सरला या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 days ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

6 days ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

2 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 month ago