ओळखीचा फायदा घेत २ लाख रुपये उसने घेतले,ओळखीचा फायदा घेत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध प्रस्तापित केले आणि हे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर भावाने पत्नीला माहेरी घालवून दिल्याने राग धरत व उसनेने घेतलेले पैसे बुडविण्याच्या हेतून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच माझ्या भावाने स्वतःचे राहते घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद ३ सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या बहिणीने पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या प्रकरणी १ संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे समजते.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार सदर मयत तरुण व त्याची बहीण हे पंढरपुर शहरापासून जवळच असलेल्या एका गावात शेजारीच राहतात.त्यांच्या घनिष्ठ ओळखीच्या गावातीलच एका व्यक्तीने या बहीण भावाकडून २ लाख रुपये उसने घेतले होते.यातील १ लाख रुपये त्याने परत केले मात्र याच काळात त्याचे मयताच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध निर्माण झाले.१९ जानेवारी २०२१ रोजी या दोघांना मयताने एकत्रित रंगेहाथ पकडल्यानंतर हा वाद विकोपाला गेला व त्यातूनच दुसऱ्या पत्नीस माहेरी पाठविण्यात आले.त्यामुळे सदर प्रकरणातील आरोपी हा या बहीण भावावर चिडून होता.यातूनच त्याने मयतास जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच,वारंवार जीवे मारण्याची देत असल्यानेच मानसिक त्रास होऊन माझ्या भावाने आत्महत्या केली आहे अशी फिर्याद मयताच्या बहिणीने पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…