ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट : राज ठाकरे

पुणे महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे तयारीला लागली आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत.

एका महिन्यात राज ठाकरे यांचा 8 वा पुणे दौरा आहे. आज बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, ओबीसी आरक्षण मुद्दा निकालात निघेपर्यंत निवडणूक स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

प्रशासक नेमून महानगर पालिकांवर वचक ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्य सरकारलाच महानगरपालिका निवडणूक घेण्याची इच्छा नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणूका लांबणीवर टाकण्याचा घाट घातला जातोय, असे आरोप राज ठाकरे यांनी केले आहेत. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून तिथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. जातिनिहाय जनगणनेबद्दल विचारणा झाली असता राज म्हणाले, खरंतर ही काही अवघड गोष्ट नाही. अशा प्रकारची जनगणना करण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे.

राज ठाकरे म्हणाले की, राजकीय कार्यक्रम होतात गर्दी होते. त्याद्वारे कोरोना पसरत नाही. मात्र दहीहंडी,गणेशोत्सव साजरा केला की पसरतो. मी गणेशोत्सव मंडळांशी बोलणार आहे, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, मंदिर उघडण्याची मागणी पण होतेय आणि केंद्र सरकार सणासुदीला गर्दी करू नका म्हणतंय. एकूण सगळ्या सरकारांचं बरं चाललंय. सगळं बंद हे त्यांना आवडतंय, असंही ते म्हणाले.

तिसरी लाट, चौथी लाट म्हणत लोकांत भीती पसरावयची असं सुरु असल्याचंही ते म्हणाले. लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करायला नको, असंही ते म्हणाले. 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना लस देता येणार नाही असं पूनावाला म्हणालेत.. लसीकरण झालं की कॉलेज सुरू करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

14 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

14 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago