ताज्याघडामोडी

महिला तलाठी मोबाईल चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

 

अकोला तालुक्यातील म्हैसांग याठिकाणी तलाठी पदावर कार्यरत असलेली  गायत्री सुनिल कोरडे  हिने पेट्रोल पंपावरील कर्माचाऱ्यांची नजर चुकवून मोबाइल लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संबंधित घटना 6 एप्रिल 2021 रोजी अकोल्यातील अग्रसेन चौकातील पेट्रोल पंपावर घडली आहे. दरम्यान आरोपी महिला तलाठी याठिकाणी आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आली होती. यावेळी त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरून झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पंपावरील मोबाइल फोन चोरला आहे.
सर्वत्र शोधाशोध करूनही कुठेही फोन आढळला नाही. शेवटी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता, एका महिला मोबाइल चोरताना आढळली. याप्रकरणी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं अज्ञात महिलेविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला असता, संबंधित मोबाइल चोर महिला म्हैसांग येथील तलाठी असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 days ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

6 days ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

2 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 month ago