Categories: Uncategorized

बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामदास खराडे यांची निवड

शेतकऱ्यांच्या,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करीत आलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामदास खराडे यांची निवड करण्यात आली आहे.बळीराजा शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नितीन बागल आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर,महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री बोरा यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  रामदास खराडे यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
     या निवडीनंतर बोलताना जिल्हाध्यक्ष रामदास खराडे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आपण अथक संघर्ष करणार असल्याचे सांगत कोरोना,लॉकडाऊन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची असलेली उदासीनता यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.अशातच जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसबिले थकवली आहेत,एफआरपी पूर्ण केलेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.अन्नदाता संकटात असताना बळीराजा शेतकरी संघटनेने माझ्यावर सोपविलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी हि कष्टकरी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करून मी प्रामाणिकपणे पार पाडेल अशी ग्वाही रामदास खराडे यांनी दिली. 
         
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago