बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारीयांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवत निषेध नोंदवला आहे.तर व्यापारी संघटनेने बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
19 वर्षाची गर्भवती काल दुपारी तपासणीसाठी आली. तिला सोनोग्राफी करायची असा कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोललाअसा तरुणीचा आरोप आहे.हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…