या प्रकरणी पोहेक/ 104 परशुराम तात्याराम शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मौजे शेगावदुमाला ता पंढरपूर येथे भिमा नदीपात्रातून मोटारसायकलद्वारे अवैधरित्या वाळु काढून दुचाकीवर भरुन वाहतूक करीत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी खात्री करणेकरीता व कारवाईकरीता आम्ही खाजगी मोटारसायकलीने गेले असता पो.ना. भोसले,पो.ना. ताटे,पो.हे.क.शिंदे हे सदर ठिकाणी गेले असता मौजे शेगांवदुमाला ता पंढरपूर येथील स्मशानभुमीपासून भिमा नदीपात्राचे कडेचे रोडने जात असताना समोरुन पाच मोटारसायकलवर पाठीमागे ठिक्यामध्ये वाळु भरुन येत असताना दिसले.पोलीस आल्याचे दिसताच दोन मोटार सायकलस्वार दुचाकीसह पळून गेले तर तिघांनी आपल्या मोटारसायकली जागीच टाकून पळ काढला.त्यापैकी एकाच पाठलाग करून पकडण्यास पोलिसांना यश आले.
या कारवाईत काळया लाल रंगाची होंडा कंपनीची शाईन दुचाकी एम.एच. 13 बी.जे.6119 व मागील ठिक्यात 06 पाटया वाळु, एक काळया गुलाबी रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी नं. एम.एच. 13 एफ. 4923 व मागील ठिक्यात 06 पाटया वाळु व एक काळया गुलाबी रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी तिचा नं.एम.एच. 13 ए.एल. 1545 असा असून या प्रकरणी प्रशांत गौतम इंगळे रा.शेगावदुमाला ता.पंढरपूर यांच्यासह अज्ञात मोटारसायकल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसात पंढरपुर शहर व तालुक्यातून मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या मोटारसायकलीचे नंबरप्लेटवरील नंबर आणि प्रत्यक्ष मालकी याची खातरजमा होणे गरजेचे झाले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…