ताज्याघडामोडी

अनिल परबांना ‘या’ प्रकरणात ईडीने बजावली नोटीस, मंगळवारी राहावे लागणार हजर

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिल परब यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.सचिन वाझे प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अनिल परब यांनी ईडीने नोटीस बजावली असून मंगळवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन वाझेनं त्याच्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतले होते.

परब यांनी बीएमसी ठेकेदारांची माहिती दिली होती. याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. सचिन वाझे याने 3 एप्रिल रोजीच्या सुनावणीत आपल्याला न्यायालयाला काही सांगायचे आहे, असं म्हटलं होतं. त्यावेळेस न्यायालयाने वाझेला सांगितले होते की, आपले म्हणणे लेखी स्वरुपात द्या.

त्यानंतर आज सचिन वाझेनं लेखी पत्र दिलं होतं. यात;पोलीस दलात पुन्हा नियुक्त व्हायचे असेल तर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्याच प्रमाणे अनिल देशमुख व्यतिरिक्त महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्यावरही सचिन वाझे याने गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे याने लिहिलेल्या ४-५ पानी पत्रात मुंबई महानगर पालिकेचे कंत्राटदार, मुंबईचे बार रेस्टॉरंट मालक यांच्याकडून लाखो रुपये वसूल करण्याचा दबाव सचिन वाझे वरती केला होता असा आरोप पत्रात केला आहे.

मला परत पोलीस खात्यात नियुक्ती करण्यास शरद पवारांचा विरोध होता. परंतु तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची मनधरणी करणार आहोत आणि त्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन करोड रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाजे याने पत्रात केला होता. सध्या आपली परिस्थिती दोन करोड रुपये देण्याची नसल्याची सचिन वाजे याने गृहमंत्र्यांना सांगितलं होतं.

त्यावरती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भविष्यात पैसे चुकते करण्याचे सचिन वाजे याला सांगितले होते असा दावा सचिन वाझेनं पत्रात केला. अनिल परब हे आपल्या मार्फत बरीचं काम करवून घेत असल्याचा दावा देखील सचिन वाझे याने पत्रात केला. पत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे, सचिन वाजे लिहितो की अनिल परब यांनी मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येकी दोन करोड रुपये प्रत्येक कंत्रादारांकडून करून वसूल करण्याचे आदेश दिले होते आणि अशा 50 कंत्राटदारांची यादी ही सचिन वाझे याला अनिल परब याने दिली होती, असं ही पुढे सचिन वाझेने पत्रात लिहिले होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago