Categories: Uncategorized

भारतीय जनता युवा मोर्चाच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी रोहित उर्फ लाला पानकर यांची निवड

भारतीय जनता युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज भाजपाचे  जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकेश घोडके यांनी जाहीर केल्या असून या निवडीत पंढरपूर शहर अध्यक्षपदी रोहित उर्फ लाला पानकर यांची तर पंढरपूर तालुकाध्यक्षपदी सुनील भोसले यांची निवड करण्यात आली आहे.   

गेल्या काही महिन्यापासून भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्षपद रिक्त होते.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार आ.समाधान आवताडे यांच्या विजयासाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते.या निवडीनंतर पंढरी वार्ताशी बोलताना लाला पानकर यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मुकेश घोडके,भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के,शहराध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक,आमदार समाधान आवताडे,युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सोबत पंढरपूर शहरात भाजयुमो आणखी बळकट करू अशी ग्वाही दिली आहे.  

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago