भारतात आताच्या स्थितीत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे.सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे तर नक्कीच नाही. असं भाकित ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांनी केलं आहे. ते आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्सड् रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आहेत.
प्रसिद्ध जीवाणूतज्ञ डॉ. टी जॉन जेकब यांच्या भाकितामागे असलेला विश्वास हा सीएसआयआरच्या संशोधनातून सिद्ध झालेला आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाव्हायरसच्या महासाथीची तिसरी लाट येईल का यावर सीएसआयआरने अभ्यास केला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष लवकरच जाहीर होणार आहेत.
जवळपास अशाच प्रकारचा विश्वास जागतिक आरोग्य संस्थेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनीही व्यक्त केलाय. भारतातील कोरोनाव्हायरस आता कमकुवत झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय, तसंच भारतीय आता कोरोनासोबत जगायला शिकले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्याकडून मिळालेला हा दिलासा खूपच महत्वाचा आहे. आयसीएमआरच्या प्रगत विषाणूविज्ञान संशोधन केंद्राचे माजी डॉ. जॉन जेकब यांनीही आपल्या संशोधनातून डॉ. स्वामिनाथन यांच्याच मताला दुजोरा दिला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…