Categories: Uncategorized

गुटखा,सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या पुळूज येथील किराणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई

दि. २३/०८/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना प्राप्त गोपनीय माहिती नुसार पुळूज तालुका पंढरपुर येथील मानसी किराणा व जनरल स्टोअर्स या आस्थापनाची तपासणी केली असता या किराणा दुकानात विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, सुपरजेम पानमसाला, एस ९९ तंबाखू, आर एम डी पान मसाला, एम सुगंधित तंबाखू इत्यादींचा एकूण ४१४९०/- किमतीचा साठा अन्न पदार्थांच्या आड लपवून विक्रीसाठी साठा ठेवण्यात आल्याचे आढळुन आले. 
सहाय्यक आयुक्त (अन्न). श्री. प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक  प्रशांत कुचेकर यांनी यांनी सदर किराणा दुकानाची तपासणी करून प्रतिबंधित गुटखा,सुगंधी तंबाखू आदींचा साठा सील करून ताब्यात घेतला आहे. आरोपी पेढी मालक उमेश बाबू बाबर यांचेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षपात्र कलम ५९ व भा द वि कलम १८८, २७२, २७३,३२८ प्रमाणे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणातील आरोपीने साठा कोठून आणला, कोणाला देणार होते, अजून कोठे साठा करून ठेवला आहे का, या व्यवसायातील भागीदार कोण आहे का याची माहिती मिळणे करिता सरकारतर्फे सदर फिर्याद देण्यात आली आहे.
सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. शिवाजी देसाई यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

17 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

17 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago