जसा सोशल मीडियाचा संर्पक साधण्यासाठी,आयुष्यातील बरे वाईट अनुभव शेअर करण्यासाठी,माहिती शेअर करण्यासाठी वापर होतो तसाच काही अपप्रवृत्ती याचा गैरवापर करून अनेकांना गंडा घालत असल्याचे वेळावेळी अनेक घटनांमधून पुढे आले आहे.असाच एक प्रकार पुन्हा उजेडात आला असून सोशल मीडियावरून जवळीक वाढवत एका १९ वर्षीय मुलीने एका बांधकाम व्यवसायिकाला आपल्या साथीदाराच्या मदतीने जाळ्यात ओढून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यवसायिकाने धाडसाने पोलिसात फिर्याद दिली आणि हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. उरळी कांचन परिसरातील एका व्यवसायिकाकडून 20 लाख रूपये उकळल्याचे समोर आले आहे.कोंढवा पोलिसांनी रवींद्र भगवान बदर (वय 26, रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा. येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय 40, रा. गोकुळनगर, कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय 32, रा. बाणेर, मूळ- माढा, सोलापूर), मंथन शिवाजी पवार (वय 24, रा. इंदापूर), आणि 19 वर्षीय तरुणी यांना नुकतीच अटक केली होती.
असाच आणखी एक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून टोळीला पकडल्यानंतर व्यवसायिकाने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुणीने व्यवसायिकाशी इन्स्टाग्रामवरून ओळख केली. त्यानंतर त्यांना लोणीकाळभोर परिसरात भेटण्यास बोलविले. त्या ठिकाणी व्यवसायिकासोबत तरुणीने जबरदस्तीने संबंध ठेवले. त्यानंतर साथीदारांना बोलवून घेतले. तक्रारदार यांना यवत पोलिस ठाण्यासमोर घेऊन गेले. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 50 लाख रूपयांची खंडणीची मागणी केली. शेवटी तडजोड म्हणून 20 लाख रूपये त्यांच्याकडून घेतले. त्यानुसार 19 वर्षाच्या तरुणीसह तौसिफ शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, ऋतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…